मुंबई : आपल्या दोन अल्पवयीन मुलांचे भवितव्य, त्यांचे शिक्षण आणि कल्याणाच्या मुद्याबाबत एकमेकांशी बोलावे आणि तोडगा काढावा, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची विभक्त पत्नी झैनब हिला दिले.

आपली १२ वर्षांची मुलगी आणि सात वर्षांचा मुलगा कुठे आहे हे झैनब हिला उघड करण्याचे आदेश द्या या मागणीसाठी नवाजुद्दीन याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने हेबियस कॉर्पस (संबंधित व्यक्तीला हजर करण्यासाठी) याचिकेद्वारे ही मागणी केली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी ही याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी नवाजुद्दीन आणि झैनब यांनी मुलांबाबत एकमेकांशी बोलून तोडगा काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याचिककर्त्याला केवळ त्याच्या मुलांची आणि त्यांच्या शिक्षणाची चिंता आहे. त्यामुळे याचिकाकर्ता आणि प्रतिवादीने एकमेकांशी बोलावे. तसेच याचिकाकर्त्याला मुलांशी संवाद साधता यावा आणि त्यांना भेटता यावे याचा निर्णय घ्यावा.

nda government set up a national commission to review the performance of constitution zws
संविधानभान : संविधानाच्या कामगिरीचा आढावा 
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Dabur Vs Patanjali
Dabur Vs Patanjali : च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून डाबर आणि पतंजली भिडले! बाबा रामदेव यांच्या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स
institutions values and provisions in indian constitution
संविधानभान : आधुनिक भारताची संस्थात्मक उभारणी
Naga Sadhus in Kumbh Mela
Maha Kumbh Mela 2025: नागा साधू कोण आहेत? त्यांचा कुंभमेळ्याशी काय संबंध? त्यांनी हिंदू धर्माचे रक्षण कसे केले?
Shiv sena Sanjay Shirsat
Santosh Deshmukh Case : शिंदेंच्या शिवसेनेने घेतलं संतोष देशमुखांच्या कुटुंबाचं पालकत्व; संजय शिरसाटांनी दिली मोठी माहिती
court advised police to select only government employees while selecting witnesses
“शासकीय कर्मचाऱ्यांनाच साक्षीदार करा,” उच्च न्यायालयाने असा सल्ला का दिला?
chhagan bhujbal meets devendra fadnavis
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीसांना भेटून आल्यावर भुजबळ म्हणतात, “मी त्यांना सगळं सांगितलं आहे, त्यांनी ८-१० दिवस…”

दोन्ही पक्षांमध्ये याबाबत तोडगा निघाल्यास मुलांच्या दृष्टीने ते  चांगले आहे. म्हणूनच याचिकाकर्ता आणि प्रतिवादीने परस्पर सामंजस्याने तोडगा काढण्याचे न्यायालयाने म्हटले. दोन्ही मुले कुठे आहेत याची याचिककर्त्याला काहीच माहिती नाही.  मुले दुबईत असल्याची त्याची धारणा होती. परंतु मुलांच्या शाळेने ई-मेलद्वारे मुले शाळेत येत नसल्याचे आणि त्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकले जाईल, असे नवाजुद्दीन याला कळवल्याचे त्याचे वकील प्रदीप थोरात यांनी न्यायालयाला सांगितले. झैनब नोव्हेंबरमध्ये भारतात आली होती. त्यावेळीही ती एकटीच आली होती. ती आणि दोन्ही मुले दुबईतच वास्तव्यास असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

त्याची न्यायालयाने दखल घेतली. तसेच दोन्ही मुले सध्या कुठे आहेत याबाबत झैनब हिच्या वकिलांकडे विचारणा केली. दोन्ही मुले त्यांच्या आईसोबत असून ते तिला सोडू इच्छित नाहीत आणि त्यांना भारतातच राहून शिक्षण घ्यायचे आहे, असे झैनब हिचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर मुले आईच्या ताब्यात आहेत हे निश्चित झाले आहे. परंतु,  मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये असे आम्हाला वाटते. याचिकाकर्त्यालाही त्याबाबत चिंता आहे. त्यामुळे झैनब हिने पुढील सुनावणीच्या वेळी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Story img Loader