मुंबई : आपल्या दोन अल्पवयीन मुलांचे भवितव्य, त्यांचे शिक्षण आणि कल्याणाच्या मुद्याबाबत एकमेकांशी बोलावे आणि तोडगा काढावा, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची विभक्त पत्नी झैनब हिला दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आपली १२ वर्षांची मुलगी आणि सात वर्षांचा मुलगा कुठे आहे हे झैनब हिला उघड करण्याचे आदेश द्या या मागणीसाठी नवाजुद्दीन याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने हेबियस कॉर्पस (संबंधित व्यक्तीला हजर करण्यासाठी) याचिकेद्वारे ही मागणी केली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी ही याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी नवाजुद्दीन आणि झैनब यांनी मुलांबाबत एकमेकांशी बोलून तोडगा काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याचिककर्त्याला केवळ त्याच्या मुलांची आणि त्यांच्या शिक्षणाची चिंता आहे. त्यामुळे याचिकाकर्ता आणि प्रतिवादीने एकमेकांशी बोलावे. तसेच याचिकाकर्त्याला मुलांशी संवाद साधता यावा आणि त्यांना भेटता यावे याचा निर्णय घ्यावा.
दोन्ही पक्षांमध्ये याबाबत तोडगा निघाल्यास मुलांच्या दृष्टीने ते चांगले आहे. म्हणूनच याचिकाकर्ता आणि प्रतिवादीने परस्पर सामंजस्याने तोडगा काढण्याचे न्यायालयाने म्हटले. दोन्ही मुले कुठे आहेत याची याचिककर्त्याला काहीच माहिती नाही. मुले दुबईत असल्याची त्याची धारणा होती. परंतु मुलांच्या शाळेने ई-मेलद्वारे मुले शाळेत येत नसल्याचे आणि त्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकले जाईल, असे नवाजुद्दीन याला कळवल्याचे त्याचे वकील प्रदीप थोरात यांनी न्यायालयाला सांगितले. झैनब नोव्हेंबरमध्ये भारतात आली होती. त्यावेळीही ती एकटीच आली होती. ती आणि दोन्ही मुले दुबईतच वास्तव्यास असल्याचेही थोरात यांनी सांगितले.
त्याची न्यायालयाने दखल घेतली. तसेच दोन्ही मुले सध्या कुठे आहेत याबाबत झैनब हिच्या वकिलांकडे विचारणा केली. दोन्ही मुले त्यांच्या आईसोबत असून ते तिला सोडू इच्छित नाहीत आणि त्यांना भारतातच राहून शिक्षण घ्यायचे आहे, असे झैनब हिचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर मुले आईच्या ताब्यात आहेत हे निश्चित झाले आहे. परंतु, मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये असे आम्हाला वाटते. याचिकाकर्त्यालाही त्याबाबत चिंता आहे. त्यामुळे झैनब हिने पुढील सुनावणीच्या वेळी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.