श्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्या निवडणूक प्रचारात बॉलिवूड अभिनेता सलमान खान सहभागी झाल्याने तमिळ भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, तमिळ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.
सलमानच्या घराबाहेर निदर्शने करणाऱ्या तमिळ नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच सलमानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.  तमिळ भाषिकांवर अन्याय करणा-या श्रीलंकन पंतप्रधानाच्या निवडणूक प्रचारात सलमान खानला सहभागी व्हायची गरज काय होती, असा आरोप करीत तमिळ संघटनेच्या ५० कार्यकर्त्यांनी सलमानच्या वांद्रे येथील निवासस्थानावर हल्लाबोल केली. या वेळी तमिळ कार्यकर्त्यांनी सलमानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Story img Loader