श्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्या निवडणूक प्रचारात बॉलिवूड अभिनेता सलमान खान सहभागी झाल्याने तमिळ भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, तमिळ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.
सलमानच्या घराबाहेर निदर्शने करणाऱ्या तमिळ नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच सलमानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तमिळ भाषिकांवर अन्याय करणा-या श्रीलंकन पंतप्रधानाच्या निवडणूक प्रचारात सलमान खानला सहभागी व्हायची गरज काय होती, असा आरोप करीत तमिळ संघटनेच्या ५० कार्यकर्त्यांनी सलमानच्या वांद्रे येथील निवासस्थानावर हल्लाबोल केली. या वेळी तमिळ कार्यकर्त्यांनी सलमानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 04-01-2015 at 12:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamil group protests against salman over rajapaksa support