तामिळनाडूतील भारनियमनाचा त्रास कमी करण्यासाठी तेथे वीजचोरी आणि थकबाकीच्या प्रमाणानुसार भारनियमन करण्याचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’ राबवण्याची मागणी तामिळनाडू विद्युत ग्राहकांच्या संयक्त परिषदेने केली आहे. तामिळनाडूतील उद्योजक, व्यापारी भारनियमनामुळे हैराण आहेत. या प्रश्नावर नुकतीच विद्युत ग्राहकांच्या परिषदेची बैठक झाली. तामिळनाडूतील भारनियमनात सुसूत्रता आणण्यासाठी चेन्नईसाठी स्वतंत्र वीज वितरण कंपनी असावी आणि राज्यातील भारनियमनमुक्तीसाठी‘ महाराष्ट्र पॅटर्न’ लागू करावा, अशी भूमिका या परिषदेचे अध्यक्ष डी. बालसुंदरम यांनी बैठकीत मांडली.

Story img Loader