ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा धाकटा मुलगा तन्मय कर्णिक यांचे बुधवारी रेल्वे अपघातात निधन झाले. त्यांच्यावर ओशिवारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मंगळवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास अंधेरी ते विलेपार्ले स्थानकांदरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना त्यांना लोकलची धडक बसली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारांसाठी कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास त्यांचे निधन झाले. या प्रकरणी पोलीसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.
मधु मंगेश कर्णिक यांच्या धाकट्या मुलाचे रेल्वे अपघातात निधन
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा धाकटा मुलगा तन्मय कर्णिक यांचे बुधवारी रेल्वे अपघातात निधन झाले.
First published on: 02-09-2015 at 04:52 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanmay karnik passed away in railway accident