मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे परदेशी चलनाच्या तस्करीचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने टान्झानियन नागरिकाला अटक केली आहे. त्याच्याकडून अडीच लाख अमेरिकन डॉलर्स (सुमारे दोन कोटी रुपये किंमत) जप्त करण्यात आले असून आरोपीविरोधात सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी मुंबईतून टान्झानियाला जात होता. या तस्करीत आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा सीमाशुल्क विभागाला संशय आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इथोपिया मार्गे टान्झानियाला जाणाऱ्या २६ वर्षीय परदेशी नागरिकाला सीआयएसएफच्या जवानांनी सोमवारी ताब्यात घेतले. त्याच्या बॅगमध्ये काही संशयीत बाबी असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले होते. त्याची बॅग उघडली असता त्यात दोन लाख ४० हजार अमेरिकन डॉलर्स (दोन कोटी आठ हजार रुपये) सापडले. याबाबतची माहिती सीमाशुल्क विभागाला देण्यात आली. त्यानुसार आरोपी यासिर अली मोहम्मद याला सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतले. तो टान्झानियातील रहिवासी असून त्याने आपण कापड व्यावासायिक असल्याचा दावा केला आहे.

Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
fugitive gangster arrested , Lonavala , MPDA ,
‘एमपीडीए’ कारवाई केलेल्या फरार गुंडाला लोणावळ्यातून अटक
cybercrime digital arrest scam
Digital Arrest Scam: ‘डिजिटल अरेस्ट’ स्कॅमद्वारे देशभरात हजारो कोटींची लूट करणाऱ्या मास्टरमाईंडला अटक
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
Two arrested for illegally carrying pistols
बेकायदा पिस्तूल बाळगणारे दोघे अटकेत
three suspect arrested in attempted kidnapping school boy
उमराळ्यात शाळकरी मुलास पळविण्याचा प्रयत्न; तीन संशयितांना अटक
aiu arrested two passengers from Mumbai airport for smuggling ganja
बँकॉकवरून आणलेला सव्वाचार कोटी रुपये किंमतीचा गांजा जप्त, दोन प्रवाशांना अटक

हेही वाचा : मुंबई : सहार पोलिसांच्या ताब्यातून बांगलादेशी महिलेचे पलायन

चौकशीत आरोपी मुंबईहून इथोपिया व इथोपियावरून दुसऱ्या विमानाने टान्झानियाला जाणार होता. तेथील एका व्यक्तीकडे त्याला परदेशी चलन सुपूर्द करायचे होते. पण त्यापूर्वीच मुंबई विमानतळावर त्याला अटक झाली. याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने परदेशी चलन ताब्यात घेतले. परदेशी चलनाबाबत कोणतीही माहिती न देता ते परदेशात घेऊन जात असल्याप्रकरणी त्याच्याविरोधात सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या तस्करीत आंतरराष्ट्रीय हवाला रॅकेटचा सहभाग असल्याचा सीमाशुल्क विभागाला संशय असून त्याबाबत तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader