मुंबई : सागरी मार्गाच्या कामामुळे तारापोरवाला मत्स्यालयाच्या इमारतींना धक्का पोहोचल्याची बाब समोर आल्यानंतर ही धोकादायक इमारत त्वरित खाली करण्याचे आदेश मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. मत्स्यालयाच्या समोरच सागरी मार्गाचे काम सुरू असून या कामामुळे मत्स्यालयाच्या इमारतीला धक्का पोहोचल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने संरचनात्मक परीक्षणाच्या आधारे दिला.  त्यामुळे ही इमारत लवकर खाली करण्याचे आदेश मुनगंटीवार यांनी दिले. तसेच शहरात लवकरच नवीन मत्स्य संकुल आणि अत्याधुनिक मत्स्यालय उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 नवीन मत्स्यालय जागतिक दर्जाचे  आणि सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर विकसित करण्याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करावा. हे मत्स्यालय जगातील सर्वोत्तम मत्स्यालयापैकी एक गणले जावे, याचे नियोजन करण्याची सूचनाही मुनगंटीवार यांनी बैठकीत दिल्या. मुंबईची ओळख असलेले तारापोरवाला मत्स्यालय  काही दिवसांपासून पर्यटकांसाठी बंद आहे. सध्या तारापोरवाला मत्स्यालयात १६ सागरी पाण्याच्या टाक्यांमध्ये ३१ प्रकारचे मासे आहेत. तर गोडय़ा पाण्यातील आणि ३२ ट्रॉपिकल टाक्यांमध्ये ५४ प्रकारचे मासे आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taraporwala aquarium hit seaway work fisheries minister order vacate building ysh