मुंबई : लहान मुलांवर कर्करोगाचे उपचार करण्यासाठी टाटा रुग्णालयाने संलग्न पाच केंद्रामध्ये सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील आराखडा तयार करण्यात येत असून, या केंद्रांच्या माध्यमातून दरवर्षी सहा हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करणे शक्य होईल.

परळ येथील टाटा रुग्णालयात कर्करोगग्रस्त लहान मुलांवर उपचार करण्यात येतात. टाटा रुग्णालयाच्या माध्यमातून खारघरसह, गुवाहाटी, वाराणसी, विशाखापट्टणम आणि चंदीगड येथील रुग्णालयांमध्ये दरवर्षी चार हजारांपेक्षा अधिक  रुग्णांवर उपचार केले जातात. चंदीगड व विशाखपट्टणम येथे केवळ १०० मुलांवर उपचार करण्याची व्यवस्था आहे. मात्र अधिकाधिक मुलांना उपचार मिळावेत, यासाठी टाटा रुग्णालयाने कंबर कसली असून सर्व संलग्न केंद्रांमध्ये बालरुग्णांसाठी सुविधा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सहा केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध असली, तरी लवकरच अन्य पाच केंद्रांवरही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. प्रत्येक केंद्रावर दरवर्षी किमान एक हजार रुग्णांवर उपचार केले जावेत, यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. सर्व केंद्रांवर सुविधा उपलब्ध करण्यासाठी किमान दोन वर्षे लागण्याची शक्यता असल्याची माहिती टाटा रुग्णालयाचे बालरुग्ण ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश चिन्नास्वामी यांनी दिली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>>वंचित बहुजन आघाडीचा २२ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या कार्यालयावर मोर्चा

देशात दरवर्षी सुमारे ७० हजार लहान मुलांना कर्करोगाची लागण होत असल्याचे दिसते. यावर मार्ग काढण्यासाठी टाटा रुग्णालायने कंबर कसली आहे.

निधी उभारण्याचा प्रयत्न

’टाटा रुग्णालयाशी संलग्न असलेल्या या केंद्रांमध्ये बालरुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, यासाठी रुग्णालय दात्यांच्या माध्यमातून निधी उभा करत आहे.

’या निधीतून फक्त मुलांवर उपचार करण्याबरोबरच त्यांचे पोषण, शिक्षण आणि राहण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

’गतवर्षी टाटा रुग्णालयाने रुग्णांसाठी ६० कोटी रुपयांचा निधी जमा केला होता.

Story img Loader