मुंबई : कर्करोगावरील महागडे उपचार अनेक रुग्णांच्या आवाक्याबाहेर बाहेर असतात. काही डॉक्टर वैयक्तिक फायद्यासाठी अधिक महागडे उपचार रुग्णांना सुचवत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्यामुळे टाटा रुग्णालयाने रुग्णांमध्ये कर्करोगावरील उपाचाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. उपचाराचे स्वरूप, त्याचे फायदे आणि तोटे याबाबत माहिती देऊन रुग्णांना उपचाराची दिशा ठरविण्याचा निर्णय घेण्याची मुभा देण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या माजी अधिसभा सदस्य डॉ. सुप्रिया करंडे शिंदे गटात
सर्वसाधारणपणे महागडी औषधे किंवा उपचार पद्धती उत्तम असते असा नागरिकांमध्ये समज आहे. मात्र अनेकदा एखादे स्वस्त औषध चांगले परिणाम देत असते. मात्र याबाबत डॉक्टरांकडून रुग्णांना योग्य मार्गदर्शन होत नाही. ही बाब लक्षात घेऊन रुग्णांना कोणते उपचार आर्थिकदृष्ट्या आणि अधिक परिणमकरक ठरू शकतात हे ठरविण्यास मदत व्हावी यासाठी टाटा रुग्णालय, रायपूर येथील बाल्को वैद्यकीय केंद्र आणि नॅशनल कॅन्सर ग्रिड यांनी एकत्रितरित्या पुढाकार घेतला आहे. ‘ऑन्कॉलॉजीमधील सामान्य ज्ञान’ या थीम अंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
हेही वाचा >>> हरवलेली शांती शोधण्यासाठी महिलेने मुंबई पोलिसांकडे मदत मागितल्यावर मिळाले असे अनोखे उत्तर; Post व्हायरल
कर्करोगावर विविध पातळ्यांवर संशोधन सुरू आहे. यामध्ये नव्याने केलेल्या संशोधनाचे दूरगामी परिणाम लक्षात न घेता रुग्णांवर उपचार केले जातात. अनेक संशोधनाचे भविष्यातील परिणाम भिन्न असतात. त्यामुळे रुग्णांना त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराची माहिती देणे, त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देणे, संशोधन करणे, धोरण ठरविणे, माध्यमांमध्ये सकारात्मक बातम्या प्रसिद्ध करणे यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती टाटा मेमोरियल सेंटरच्या प्राध्यापिका आणि वैद्यकीय ऑन्कोलॉजीच्या प्रमुख डॉ. मंजू सेंगर यांनी सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून कर्करोगाच्या रुग्णांना उपचार पद्धतीची निवड करण्याची मुभा देऊन सक्षम करण्यात येणार आहे. कर्करोगाबद्दल रुग्णांना कमीत कमी चिंता, कमी खर्च आणि अनावश्यक भीती टाळून, तपासणी करून जागरूक करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच उपचाराची प्राथमिक निवड, लवकर उपचार आणि माफक खर्चाचे ध्येय ठेवून उपचार करण्यात येणार असल्याचे बाल्को मेडिकल सेंटर, रायपूर येथील वैद्यकीय संचालक आणि ऑन्कोलॉजी उपक्रमातील सामान्य ज्ञानाच्या संस्थापक सदस्या डॉ. भावना सिरोही यांनी सांगितले.