मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही १९ जानेवारी रोजी टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५चेा आयोजन करण्यात आले असून या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी विशेष लोकलची व्यवस्था करण्यात आली आहे. टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेवरून शनिवार, १८ जानेवारी रोजी मध्यरात्री विरार – चर्चगेट, बोरिवली – चर्चगेट आणि चर्चगेट – वांद्रे अशा तीन विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा…‘कासारवडवली गायमूख मेट्रो ४ अ’ प्रकल्पाच्या खर्चात ६३.६७ कोटींनी वाढ; प्रकल्प पूर्णत्वाची मुदतही चुकवली, दिरंगाईसाठी कंत्राटदाराला नाममात्र २२ लाखांचा दंड

विरार येथून शनिवारी मध्यरात्री २.१५ वाजता विशेष लोकल सुटेल. ही लोकल चर्चगेट येथे पहाटे ३.५५ वाजता पोहचेल. बोरिवली येथून शनिवारी मध्यरात्री ३.०५ वाजता विशेष लोकल सुटेल आणि चर्चगेट येथे पहाटे ४.१३ वाजता पोहचेल. चर्चगेट येथून शनिवारी मध्यरात्री ३ वाजता विशेष लोकल सुटेल आणि वांद्रे येथे मध्यरात्री ३.३४ वाजता पोहचेल. या तिन्ही विशेष लोकल सर्व स्थानकांवर थांबतील, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata mumbai marathon 2025 is scheduled on 19th january with special local train for competitors mumbai print news sud 02