मुंबई : टाटा वीज कंपनीने १ एप्रिलपासून वीजदरवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाला सादर केला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास छोट्या घरगुती ग्राहकांना जास्त भार सहन करावा लागेल. २०२२-२३ आणि २३-२४ या आर्थिक वर्षांसाठी आयोगाने मंजूर केलेले दर आणि प्रत्यक्षात मिळालेला महसूल याचा आधार घेत तूट भरून काढण्यासाठी टाटा कंपनीने हा प्रस्ताव दिला आहे.
हेही वाचा >>> मुंबई :चारकोपमधील खारफुटी परिसरात आग
दरमहा सुमारे ३०० किंवा ५०० युनिटपर्यंत वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांना बिले पाठविणे आणि ती वसूल करणे, हे काम कठीण असते. या पार्श्वभूमीवर ०-१०० युनिटसाठी तब्बल २०१ टक्के वाढ प्रस्तावित असून १०० ते ३०० युनिटपर्यंत ६० टक्के व ३०१ ते ५०० युनिटपर्यंत १० टक्के वाढीचा प्रस्ताव आहे. प्रस्ताव मान्य झाल्यास टाटा कंपनीचे ५०० युनिटपर्यंतचे दर अदानींच्या कंपनीपेक्षा अधिक असतील. त्यामुळे ग्राहक अदानींकडे परतण्याची शक्यता आहे.
सध्याचे वीजदर
युनिट । अदानी । टाटा । बेस्ट
०-१०० । ३.१५ । ४.९६ । १.८७
१०१-३०० । ५.४० । ६.९७ । ५.४६
३०१-५०० । ७.१० । ८.४० । ९.५६
५०१ पेक्षा अधिक । ८.१५ । ७.९४ । ११.७३