मुंबईत वानखेडे मैदानावर होणाऱया शपथविधी सोहळ्यामध्ये भाजपचे विधीमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नऊ आमदारांनी शुक्रवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. अपेक्षेप्रमाणे यामध्ये भाजपच्या राज्यातील कोअर समितीतील सर्व सदस्यांचा समावेश करण्यात आला. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी वृत्तवाहिन्यांना मंत्रिमंडळात समावेश केला जाणाऱया आमदारांबद्दल शुक्रवारी सकाळीच माहिती दिली.
राज्यातील भाजपच्या पहिल्या मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार यांच्यासह एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे-पालवे, प्रकाश मेहता, विष्णू सावरा आणि चंद्रकांत पाटील यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला असून, दिलीप कांबळे आणि विद्या ठाकूर यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. 
या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी, विविध राज्यातील भाजपचे मुख्यमंत्री, कॉर्पोरेट जगतातील दिग्गज मंडळी यांच्यासोबत बॉलिवूडमधील कलाकारानीही शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा