भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीविषयी महापालिका प्रशासनाने आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या नगरसेविकांनी गुरुवारी जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. याप्रकरणी महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर तब्बल तीन तासांनी पोलिसांच्या मदतीने मळवी यांना कार्यालयाबाहेर काढण्यात आले.
शहरात भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता करप्रणाली लागू करू नये, असा निर्णय सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत घेतला होता. यासंबंधी एक ठरावही करण्यात आला होता. मात्र, हा ठराव विखंडित करण्याकरिता आयुक्त राजीव यांनी राज्य शासनाला पत्र पाठविल्याचा आरोप आ. प्रताप सरनाईक यांनी केला होता. दरम्यान, भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीविषयी गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करण्यात येत असून ठाणेकरांना कोणताही त्रास देण्याचा हेतू नाही, असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने केले होते. मात्र नव्या करप्रणालीविषयी महापालिका प्रशासनाची नेमकी भुमिका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेविकांनी जनसंपर्क कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा