मुंबई : मुंबईकरांना पुरविल्या जाणा-या नागरी सेवा-सुविधांच्या विकासासाठी कर उत्पन्न गरजेचे आहे. महानगरपालिकेचा आर्थिक रोख प्रवाह (कॅश फ्लो) सुरळीत ठेवण्यातही मालमत्ताकराची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. नागरिकांना मालमत्ताकराची देयके नियमितपणे, वेळेवर मिळावीत, करभरणा प्रक्रिया अधिकाधिक सहजसोपी व सुलभ व्हावी, यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत महानगरपालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी सोमवारी व्यक्त केले. झोपडपट्टी भागातील व्यावसायिक मालमत्तांचा शोध घेऊन त्यांनाही कराच्या कक्षेत आणावे, अशी सूचना गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिली.

भायखळा येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी आणि कर्मचा-यांसमवेत गगराणी यांनी सोमवारी संवाद साधला. सध्या महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याकडे २ लाख ४३ हजार ९८९ मूळ मालमत्तांची नोंद आहे. त्यात निवासी आणि अनिवासी (व्यावसायिक) मालमत्तांचा समावेश आहे. मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी महानगरपालिकेने टप्पे निश्चित केले आहेत. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. कर आकारणीमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी सर्व नवीन बांधकामे, विद्यमान बांधकामे आणि मालमत्तेत बदल असल्यास त्याची माहिती इमारत प्रस्ताव, इमारत व कारखाने विभागाकडून घेतली पाहिजे. त्यासाठी महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधणे अत्यावश्यक आहे, असे गगराणी यांनी नमूद केले. मालमत्ताकर ऑनलाईन पद्धतीने भरण्याची प्रक्रिया महानगरपालिकेने सुलभ केली असली तरी त्यात आणखी सुधारणा करण्यास वाव आहे. त्यामुळे आणखी सोपे पर्याय महानगरपालिकेने उपलब्ध करून दिले पाहिजेत. नागरिकांना नागरी सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता भासणार नाही, अशी यंत्रणा उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. आर्थिक वर्षाच्या अखेरीस, मालमत्ता कराचे उद्दिष्ट गाठण्यासाठी धावाधाव करण्यापेक्षा आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कार्यक्रम निश्चित करायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

jaggery house on the banks of warna river remains closed
वारणा काठावरील गुऱ्हाळघरे झाली इतिहास जमा; जाणून घ्या, वारणा काठावर नेमकं काय झाले
Maha Kumbhmela 2025
Maha Kumbh Mela 2025: १४४ वर्षांनंतर येणारा महाकुंभमेळा…
Mumbai Municipal Corporation sent notice to developer for careless demolition of building
अंधेरीत बांधकाम व्यवसायिकाला पालिकेकडून नोटीस, इमारतीचे पाडकाम थांबवण्याचे आदेश
Binil and Jain were among the several Indian youths who had travelled to Russia
रशिया-युक्रेन युद्धात भारतीय तरुणाचा मृत्यू, एक गंभीर; अनेक महिन्यांपासून मायदेशी पाठवण्याची विनवणी केली, पण…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश कार्याध्यक्ष
suriya move to mumbai with wife jyothika and children
‘हा’ साऊथ सुपरस्टार पत्नी अन् मुलांसह मुंबईत झाला स्थायिक; म्हणाला, “या शहरातील शांती आणि…”
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक

हेही वाचा…प्रत्येक दहशतवादी प्रकरणाचा तपास जातीय पूर्वग्रहातून, दोषसिद्ध आरोपींचा उच्च न्यायालयातील अपिलात आरोप

या कार्यक्रमात करनिर्धारण व संकलन खात्याने केलेली कर वसुली, स्थावर व जंगम मालमत्ता जप्ती व अटकावणी कारवाई, कर भरण्यासाठीची जनजागृती, थकीत मालमत्ता कर वसुलीची कार्यवाही, महसूल वाढीचे नवीन स्रोत, कर वसुलीत येणा-या अडचणी कामकाजात सुलभता व सुसूत्रता येण्याकरिता उपाययोजना आदीं विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी, सहआयुक्त विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे आदी उपस्थित होते.

Story img Loader