अनुदानित अशासकीय शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग अखेर लागू करण्यात आला असून याबाबतचा निर्णय शासनाने शुक्रवारी जाहीर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होत असताना शिक्षकांना मात्र वेतन आयोग लागू करण्यात आला नसल्याचा आक्षेप संघटनांनी घेतला होता. त्याबाबत शासनाने शुक्रवारी निर्णय जाहीर केला असून शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षकांनाही वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. राज्यातील अनुदानित खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये आणि सैनिकी शाळांतील पूर्णवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू होणार आहे. ‘सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनतर शिक्षकांना याचा लाभ मिळाला होता तसेच पाचव्या वेतन आयोगाचा लाभ शिक्षकांना सुमारे  चार महिन्यांनतर देण्यात आला होता. सातवा वेतन आयोग काही दिवसांतच देण्यात आला आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांच्याबरोबर वेतन आयोग लागू होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers apply to the seventh pay commission