राज्य सरकारकडे प्रलंबित असणाऱ्या मागण्या येत्या दहा दिवसात मान्य न केल्यास फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या बारावी व त्यानंतरच्या दहावी परिक्षांवर शिक्षक बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा सोमवारी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने दिला.
या संघटनेच्या वतीने सोमवारी वाशी रेल्वे स्थानक ते दहावी-बारावी मंडळ कार्यालय असा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना त्रिस्तरीय वतेनश्रेणी लागू करावी, केंद्राप्रमाणे सहावा वेतन आयोगही शिक्षक व कर्मचाऱ्यांना लागू करावा, कायम विनाअनुदान रद्द करावे, संपकालातील पगारी रजा मंजूर करावी, अणि शिक्षकांचे निवृत्तीचे वय ६० करावे यासारख्या २० मागण्या घेऊन महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने सोमवारी दुपारी एक मोर्चा दहावी बोर्डाच्या कार्यालयावर आणला होता.
बोर्डाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांना यावेळी निवेदन देण्यात आले. दहा दिवसात सरकारने निर्णय न घेतल्यास परिक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा या संघटनेच्या वतीने देण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा