मराठी चित्रपटसृष्टीत कमाईचा नवा विक्रम प्रस्थापित केलेल्या ‘सैराट’ चित्रपटाच्या टीमने गुरूवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ‘सैराट’मध्ये काम केलेल्या मुलांचे यश आवाक करणारे असल्याचे प्रतिक्रिया यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली. याशिवाय, या सगळ्यांची कारकीर्द अशीच बहरत राहू दे आणि यापुढेही त्यांना असेच यश मिळू दे, अशी प्रार्थना उद्धव यांनी केली. ‘सैराट’मधील अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता आकाश ठोसर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह सर्व टीमला उद्धव ठाकरे यांनी सिद्धिविनायकाची मूर्ती आठवण भेट म्हणून दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा- नागराज मंजुळेच्या नावाने पसरवल्या जातायत या अफवा..

वाचा- नागराज मंजुळेच्या नावाने पसरवल्या जातायत या अफवा..