लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट स्थानकादरम्यान सोमवारी सकाळी ११ च्या दरम्यान तांत्रिक बिघाड झाला. परिणामी लोकल सेवा २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या.

या घटनेची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल १ तास १४ मिनिटांनी तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर ही बऱ्याच लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांना इच्छित स्थानक गाठण्यास विलंब झाला.

Story img Loader