कळव्यातील सह्य़ाद्रीनगर भागातील एका इमारतीच्या गच्चीवरून पडून रविवारी संध्याकाळी एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत तिच्या पतीच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली.सई निकते असे या तरुणीचे नाव असून रविवारी संध्याकाळी ती पती स्वप्नीलसह इमारतीच्या गच्चीवर गेली होती. आपल्या वडिलांना तिने तसे सांगितलेही होते. त्यानंतर २० मिनिटांत स्वप्नील आणि सई गच्चीवरून खाली पडल्याचा आवाज झाला. गच्चीवरून पडताना सई डोक्याच्या दिशेने आपटल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर स्वप्नीलचे दोन्ही पाय मोडले आहेत. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे दोघे तोल जाऊन पडले की हा आत्महत्येचा प्रयत्न आहे, या दिशेने पोलीस तपास करत आहेत.   

Story img Loader