श्वेता कात्ती ही १९ वर्षीय तरूणी लहानपणापासून मुंबईतल्या ग्रँट रोड मधील वेश्या व्यवसाय चालणा-या परिसरात वाढली. शिक्षणात मन रमेल असे वातावरण या परिसरात नाही तरीसुद्धा लहानपणापासून शिक्षणाची ओढ असलेल्या आणि वयाच्या १९व्या वर्षी उच्चशिक्षणाची आशा बाळणा-या श्वेताची हाक अमेरिका विद्यापीठाने ऐकली आणि तिला प्रवेश दिल्याचे पत्र पाठविले. श्वेताला मानसशास्त्रामधून पदवी शिक्षण घेण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी तिला एक नाही, तर तीन विद्यापीठांनी प्रवेश दिलाय. यात अमेरिका विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ आणि बार्ड विद्यापीठाचा समावेश आहे.
 
परिसरातील वातावरण आणि घरची परिस्थिती पाहता श्वेताने आपल्या करिअरचे लक्ष्य वकिल होण्यापासून ते डॉक्टर आणि नंतर शिक्षक होण्यापर्यंत ठरविले होते. त्यानंतर क्रांती या स्वयंसेवी संस्थेने तिला मदतसाठी त्याच परिसरात एक दवाखाना सुरू करून दिला. उच्चशिक्षण घेण्याची तिची निस्वार्थी आशा पाहता अमेरिका विद्यापीठ आणि इतर दोन विद्यापीठांनी तिला शिष्यवृत्ती देण्याचे ठरविले. श्वेताला आता अमेरिकेत राहण्याचा खर्च उचलण्यासाठी मदतीची गरज आहे. गेली सतरा वर्षे घरात मद्यपान करणा-या वडिलांच्या भावनिक त्रासावर मात करत श्वेताने शिक्षण सुरू ठेवले. यावर ‘माझी आईच माझ्या या शिक्षणासाठीची आशा’ असल्याचे श्वेताने म्हटले.