मुंबईतून एका १७ वर्षांच्या मुलाला अटक १६ वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी आणि तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आपल्या मुलीवर किमान तिघांनी बलात्कार केल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी केली. एवढेच नाही तिच्यावर होणाऱ्या बलात्काराचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केल्याचेही पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे. या प्रकरणी १७ वर्षांच्या मुलाला कुर्ला पोलिसांनी अटक केली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला ज्युवेनाईल जस्टिस बोर्डापुढे उभे केले जाणार आहे. तसेच त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. या प्रकरणातले इतर आरोपीही १५ ते १६ वर्षे वयोगटातीलच आहेत असेही समजते आहे. १७ वर्षांच्या मुलाप्रमाणेच इतर मुलांनाही पोलीस अटक करणार आहेत. पीडित मुलगी ज्या भागात राहते त्याच भागात तिची सेक्स क्लिप असलेला एक एमएमएस व्हायरल झाला. याची चर्चा या मुलीच्या वडिलांनाही समजली. त्यांना याबाबत जेव्हा समजले तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला याबाबत जाब विचारला. मुलीने सांगितलेली हकीकत ऐकून तिच्या वडिलांना धक्का बसला. आपल्या मुलीचे ब्लॅकमेलिंग केले जाते आहे ही बाब लक्षात आली की मुलीला ब्लॅकमेल केले जाते आहे. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ज्यानंतर हे सगळे प्रकरण उजेडात आले.
मुलीने नेमके काय सांगितले?
काही महिन्यांपूर्वी १७ वर्षांच्या मुलाने शाळेत जाता-येता माझ्याशी मैत्री केली. एका संध्याकाळी तो मला इमारतीच्या टेरेसवर घेऊन गेला. तिथे त्याने माझ्यावर बलात्कार केला आणि त्याने तो सगळा प्रकार त्याच्या मोबाइलवर चित्रीत केला. मी या प्रकाराची वाच्यता कोणाकडे केली तर तुझी सेक्स क्लिप व्हायरल करेन अशी धमकी त्याने मला दिली आणि गप्प बसायला सांगितले. काही दिवसांनी पुन्हा हा मुलगा तिला भेटला आणि त्याने तिला क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर या क्लिपचा आधार घेऊन तो मला ब्लॅकमेल करू लागला. या मुलीचा एमएमएस इतर मुलांपर्यंत कसा पोहचला याचा शोध पोलीस आता घेत आहेत.
पीडित मुलीचे वडिल मध्यमवर्गीय आहेत. त्यांनी बहुदा पोलीस स्टेशनची पायरीही कधी चढली नसावी. त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर त्यांच्या मुलीचा जबाब नोंदवण्यात आला. मॅजिस्ट्रेटसमोर पीडित मुलीच्या जबाबाचे रेकॉर्डिंग करण्यात आले. मुलीला आम्ही धीर दिला आणि तक्रार देण्यास सांगितले. त्यानंतर या मुलीने तक्रार दाखल केली. या मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर तिला ब्लॅकमेल करणाऱ्या १७ वर्षांच्या मुलाला अटक करण्यात आली असे पोलिसांनी सांगितले.