एकेकाळी तातडीचा संदेश पाठवण्यासाठी वापरण्यात येणारी ‘तार’ आता कालबाह्य झाली असली तरी त्याचा ई-अवतार स्मार्टफोनवर अधिराज्य गाजवू पाहतोय. ‘व्हॉट्सअॅप’ या मेसेंजिंग अॅपला टक्कर देण्यासाठी ‘टेलिग्राम’ हे नवे अॅप गुगल प्लेवर अवतरले आहे. या अॅपचे दोन दिवसांमध्ये तब्बल १० लाखांहून अधिक डाऊनलोड्स झाले आहेत. माहितीची सुरक्षा, एक जीबी क्षमतेपर्यंतच्या फाइल्सची देवाण-घेवाण करणे आणि एकाचवेळी २०० जणांना ग्रूपमध्ये सहभागी करून घेण्याची क्षमता ही या अॅपची प्रमुख वैशिष्टय़े आहेत.
रशियाचे सर्वात मोठे सोशल नेटवìकग प्लॅटफॉर्म असणाऱ्या ‘कोंताक्चे’ने ‘टेलिग्राम’ आणले आहे. ‘एलएलसी’ची निर्मिती असलेले हे अॅप सध्या फक्त आयफोन आणि अँड्रॉइडवरच उपलब्ध असून लवकरच ते विंडोजवरही येणार आहे.
निकोलाय आणि पॅवेल डय़ुरोव या भावंडांनी १८ महिन्यांपूर्वी रिसर्च प्रोजेक्ट म्हणून ‘टेलिग्राम’च्या निर्मितीला सुरुवात केली. त्यावेळी केवळ अत्यंत सुरक्षित आणि वापरण्यास सुलभ अशा चॅटिंग अॅपची निर्मिती एवढाच मर्यादित उद्देश त्यांनी ठेवला होता.
टेलिग्रामची वैशिष्टय़े
*हे अॅप एमटीपी प्रोटोवर आधारि आहे.
*‘सिक्रेट चॅट’चाही पर्याय उपलब्ध आहे.
*या अॅपद्वारे तुम्ही शेअर केलेली कोणतीही फाइल, फोटो, व्हिडिओ यूजरला
वेगवेगळ्या डिव्हाइसवर (फोनच नव्हे तर टॅबलेट, डेस्कटॉप इत्यादी) पाहता येतील.
* हे अॅप क्लाऊडमध्ये माहिती साठवून ठेवण्याची सुविधा देते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा