मुंबईः अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्यात दोन गोण्यांमध्ये स्फोटके ठेवण्यात आल्याचा दूरध्वनी आल्यानंतर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या. तपासणीत ते फटाक असल्याचे निष्पन्न झाले. ज्वलनशील पदार्थ रेल्वेहून आणल्यामुळे याप्रकरणी रेल्वे कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रेल्वे पोलिसांना एक दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने अमृतसर एक्स्प्रेस गाडी क्रमांक ११०५८ मधील सामानाच्या डब्यात पांढऱ्या रंगाच्या गोणीत स्फोटके असल्याची माहिती दिली. त्या गोणींवर तिरूपती टॉईज असे नमुद करण्यात आल्याचेही दूरध्वनी करणाऱ्याने सांगितले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी मुंबई पोलिसांना याबाबची माहिती दिली. ही माहिती मिळताच सर्व यंत्रण सतर्क झाल्या. रेल्वेतील पार्सल असल्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) पाचारण करण्यात आले. वाडीबंदर येथे सर्व पार्सल उतरवल्यानंतर रेल्वेतील लगेज डबा क्रमांक २०३५८४ ची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान दोन गोणींमध्ये फटाके असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी रेल्वेतून स्फोटके आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.