शक्ती मिलमध्ये ३१ जुलै रोजी टेलिफोन ऑपरेटर युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी मोहम्मद अश्फाक शेख यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पीडित युवतीकडून ओळख पटल्यावर त्याच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.
अश्फाकला गिरगाव चौपाटीवर सापळा लावून शनिवारी अटक करण्यात आली. तो मुंब्य्राचा रहिवासी असून इतके दिवस तो फरार होता. पोलिसांनी मोठय़ा शिताफीने त्यास अटक केली. रविवारी त्याला किला कोर्टासमोर हजर करण्यात आले. शेख याची ओळख पटवण्याचे काम बाकी आहे. न्यायालयीन कोठडीतच ओळख परेड शक्य होते. त्यामुळे अटक केल्यानंतर आधी पोलिस कोठडी न मागता शेखला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली.

Story img Loader