होळी म्हणजे थंडी संपण्याची चाहुल. यंदा गेले दोन-तीन दिवस तापलेल्या हवेने याचेच प्रत्यंतर दिले. सोमवारी सांताक्रूझ येथे तब्बल ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून वाढत्या उष्म्याचा हा प्रभाव मंगळवारीही कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

राज्याच्या अंतर्गत भागात गारपिटीने धुमाकूळ घातला असला तरी मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मात्र हिवाळ्यातून उन्हाळ्याचे स्थित्यंतर सुरू झाले होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमापकातील पाराही चढला आहे. आणखी एखादा दिवस हा प्रभाव कायम राहून त्यानंतर तापमान थोडे कमी होईल. मात्र मार्च हा महिना उन्हाळ्याचा असल्याने तापमान कमी-अधिक वाढत राहील, असा अंदाज मुंबई हवामानशास्त्र विभागाचे संचालक व्ही. के. राजीव यांनी वर्तवला.

 

Story img Loader