चार दिवस मुंबईकरांना घामाघूम करणारी गरम हवा मतदानादिवशी मात्र काहीशी सौम्य झाली. उन्हाळा असल्याने तापमान चढेच राहिले असले तरी चटके आणि घामाच्या धारा यांचे प्रमाण मात्र कमी झाले होते. गेले दोन दिवस पारा चढल्यावर गुरुवारी सांताक्रूझ येथे कमाल ३६.५ अंश से. तर कुलाबा येथे कमाल ३३.५ अंश से. तापमान नोंदले गेले. मुंबईत उन्हाळा सुरू झाला असून या काळात तापमान सामान्यत: ३५ अंश से. वर असते. आता तापमान फारसे खाली उतरणार नाही, असे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader