लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: जाब विचारण्यासाठी मोटारगाडीतून बाहेर आलेल्या तरुणाला टेम्पो चालकाने चिरडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री मुलुंड टोल नाका परिसरात घडली. या घटनेत मोटारगाडी चालकाचा मृत्यू झाला. याबाबत नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेनंतर पळून गेलेल्या टेंपोच्या चालकाला काही तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले.
ठाणे परिसरात वास्तव्यास असलेले भावेश सोनी (३२) काकांसोबत गुरुवारी दक्षिण मुंबईत काही कामानिमित्त गेले होते. ते रात्री १० च्या सुमारास मुलुंड टोल नाका परिसरात आले. यावेळी मागे असलेल्या टेम्पोने त्याच्या मोटारगाडीला धडक दिली आणि पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र भावेशने तत्काळ टेम्पोचा पाठलाग करून काही अंतरावर त्याला अडवले. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. याच दरम्यान, टेम्पो चालकाने भावेशच्या अंगावर टेम्पो चढवला. त्यानंतर त्याने घटनस्थळवरून पोबारा केला.
हेही वाचा… ‘त्या’ जाहिरातीमुळे सचिन तेंडुलकरची मुंबई क्राईम ब्रँचकडे धाव, फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
गंभीर जखमी झालेल्या भावेशला त्याच्या काकांनी तत्काळ ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि काही तासातच आरोपीला भिवंडी परिसरातून अटक केली. नूर मोहम्मद शहा (३३) असे या आरोपीचे नाव असून तो गुजरातमधील रहिवासी आहे.