पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाने इंडियन मुजाहिद्दिनचा म्होरक्या यासिन भटकळसह तीन दहशतवाद्यांना तर मुंबईतील स्फोटाप्रकरणी एकाला फरारी घोषित करताना या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला दहा लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. या दहशतवाद्यांबद्दल माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाचे अतिरिक्त महासंचालक राकेश मारिया यांनी सांगितले.
मुंबईत १३ जुलै २०११ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी पाचजणांना तर पुण्यात गेल्या वर्षी १ ऑगस्ट रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी आठजणांना अटक करण्यात आली होती. मात्र या बॉम्बस्फोटामागील प्रमुख सूत्रधार यासिन भटकळसह अन्य दहशतवाद्यांविरुद्ध पाठपुरावा करूनही पोलिसांना तपासात फारशी प्रगती करता आलेली नाही. १३ जुलैच्या बॉम्बस्फोटाआधी यासिन भायखळ्यात येऊन काही दिवस राहिला होता, अशी माहिती अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून उघड झाली असली तरी दिल्ली पोलिसांनी केलेल्या घाईमुळे यासिनच्या मागावर असलेल्या राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाच्या अधिकाऱ्यांना अपयश आले होते. या विभागाची अनेक पथके गेले काही महिने देशभरात विशेषत: बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आदी ठिकाणी ठाण मांडून होती. परंतु या पथकाला यश आलेले नाही.
पुणे स्फोटांप्रकरणी मोहम्मद अहमद मोहम्मद झरार सिद्धीबाबा ऊर्फ यासिन भटकळ ऊर्फ इम्रान उर्फ शाहरुख (३०) याच्यासह असदुल्ला अख्तर जावेद अख्तर उर्फ हड्डी उर्फ तबरेज उर्फ शाकीर उर्फ डॅनियल (२६) आणि वकास उर्फ अहमद (२६) या तिघांना पुण्यातील स्फोटाप्रकरणी तर तहसीन अख्तर वसीम अख्तर शेख उर्फ मोनू उर्फ हसन (२३) याला फरार घोषित करण्यात आले आहे. या चौघांची माहिती देणाऱ्यांना दहा लाखांचे इनाम देण्यात येणार आहे. या दहशतवाद्यांना अटक व्हावी यासाठी ही माहिती जाहीर करण्यात आली आहे, असेही मारिया यांनी सांगितले. या बाबतची माहिती ०२२-२३७९१६१९ किंवा ९६१९१२२२२२ / ०८६५२०१२३४५ या मोबाईल क्रमांकावर किंवा atswantedaccused@gmail.com किंवा tswantedaccused@yahoo.co.in या मेल आयडीवर द्यावी, असे आवाहन मारीया यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Feb 2013 रोजी प्रकाशित
यासिन भटकळसह चार दहशवाद्यांच्या शोधासाठी दहा लाखांचे इनाम
पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाने इंडियन मुजाहिद्दिनचा म्होरक्या यासिन भटकळसह तीन दहशतवाद्यांना तर मुंबईतील स्फोटाप्रकरणी एकाला फरारी घोषित करताना या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला दहा लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. या दहशतवाद्यांबद्दल माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाचे अतिरिक्त महासंचालक राकेश मारिया यांनी सांगितले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 12-02-2013 at 04:23 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ten lakhs award for searching four terrorist along with yasin bhatkal