मुंबई : मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टीम’मधील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यामुळे लागू केलेली १० टक्के पाणीकपात शुक्रवारी मागे घेण्यात आली. मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी परिसरातही पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीकपात केल्यामुळे ठाणे व भिवंडीकरांनाही दिलासा मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Horse Cart Race on Mumbai Highway : मुंबईतील हायवेवर रंगला टांग्यांच्या शर्यतीचा थरार! Video Viral होताच गुन्हा दाखल

हेही वाचा – वरळीतील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांतर्फे ‘शैक्षणिक मार्गदर्शन मोहीम’

पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये ३० नोव्हेंबर रोजी तांत्रिक बिघाड झाल्याचे समजताच महापालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. दुरुस्तीचे काम १, २ डिसेंबर या कालावधीत पूर्ण करण्यात आले. पाणीपुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा स्थिर झाल्यानंतर शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी पाणीकपात मागे घेण्यात आली. मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही या पाणीकपातीचा परिणाम झाला होता. मात्र, आता पाणीकपात मागे घेतल्यामुळे मुंबईसह ठाणे व भिवंडीकरांना दिलासा मिळाला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ten percent water cut back relief to the citizens of thane and bhiwandi along with mumbai mumbai print news ssb