मुंबई : वांद्रे पूर्व येथील निर्मलनगर म्हाडा वसाहतीतील संक्रमण शिबिरार्थींना पुनर्विकासाअंतर्गत कायमस्वरुपी घरे देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी शिबिरार्थींच्या शिष्टमंडळाने म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत जयस्वाल यांनी निर्मलनगर पुनर्विकासअंतर्गत संक्रमण शिबिराच्या इमारतींच्या पुनर्वसित इमारतीत अ वर्गातील मूळ भाडेकरुंना कायमस्वरुपी घरे देण्याची मागणी तत्वत: मान्य करत मूळ भाडेकरुंना मोठा दिलासा दिला आहे. तर संक्रमण शिबिरार्थींच्या लढ्याला यश आले आहे.

हेही वाचा >>> तृतीय वर्ष ‘बी. कॉम.’ पाचव्या सत्र परीक्षेत ४१.७५ टक्के उत्तीर्ण; मुंबई विद्यापीठाकडून १८ दिवसांत निकाल जाहीर

265 tenants living in mhada transit camp will get own house
लवकरच २६५ भाडेकरू संक्रमण शिबिरातून हक्काच्या घरात; बृहतसूचीवरील घरांसाठीची पहिली संगणकीय सोडत अखेर जाहिर
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Residents of Mhada transition camp get their rightful house mumbai
वर्षानुवर्षे म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांना मिळणार हक्काचे घर
pune viral video man break all traffic rules
पुणे पोलीस आहात कुठे? भररस्त्यात जोडप्याने अक्षरश: मर्यादा ओलांडली? VIDEO पाहून संतापले लोक
video of a young woman is currently going viral on social Media
जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; रील्ससाठी गायीचा आशीर्वाद घ्यायला गेली अन्…धक्कादायक VIDEO
Indias most expensive film flopped after row over same sex kiss
दोन अभिनेत्रींमधील किसिंग सीनमुळे वाद, दिग्दर्शकाचं करिअर संपलं; तब्बल १० कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले फक्त…
Goa Boycott Viral Post man called tourist trap for inflation and dirty beaches debate broke out
“गोवा म्हणजे पर्यटकांना जाळ्यात अडकवण्याचा सापळा”, गोव्यातील पर्यटनावर युजर्सचा संताप; म्हणाले, ‘घाणेरडे…
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कुणासमोरही झुकत नाही; प्रचंड स्वाभिमानी असतात, जाणून घ्या स्वभाव

निर्मलनगर वसाहतीचा ३३ (५)अंतर्गत खासगी विकासकाच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यात येत आहे. या पुनर्विकासात निर्मलनगर अभिन्यासातील मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारितील इमारत क्रमांक ९ आणि १० या दोन संक्रमण शिबिराच्या इमारतींचाही समावेश आहे. त्यानुसार या इमारतीतील संक्रमण शिबिरार्थींना इतरत्र संक्रमण शिबिराचे गाळे वितरीत करून या इमारती नुकत्याच रिकाम्या करुन घेण्यात आल्या. या इमारतीतील संक्रमण शिबिरार्थींनी मात्र इतरत्र जाण्यास नकार देत निर्मलनगर पुनर्विकासातच पुनर्वसित इमारतीत कायमस्वरुपी घरे देण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी शिबिरार्थी गुरुवारी सकाळी १० वाजता निर्मलनगर पोलीस ठाणे ते म्हाडा भवन दरम्यान मोर्चा काढणार होते. मात्र निर्मलनगर पोलिसांनी या मोर्चास परवानगी नाकारली. त्यामुळे सकाळी निर्मलनगर पोलीस ठाणे ते इमारत क्रमांक ९ -१० असा मोर्चा काढण्यात आला. यानंतर माजी नगरसेवक ॲड. मनमोहन चोणकर यांच्या नेतृत्वाखालील संक्रमण शिबिरार्थींच्या शिष्टमंडळाने म्हाडा भवनात जाऊन जयस्वाल यांची भेट घेतली.

हेही वाचा >>> बंदुकीचा धाक दाखवून दोन कोटींचे दागिने लुटणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक

जयस्वाल, म्हाडा अधिकारी आणि शिष्टमंडळ यांच्यात यावेळी बैठक झाली. या बैठकीत संक्रमण शिबिरार्थींच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली. आम्ही ४० वर्षांपासून निर्मलनगरमध्ये राहत असून आम्ही दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतीतील मूळ भाडेकरु आहोत. इथे रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्याला कायमस्वरुपी घरे दिली जातात. पण वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात राहणाऱ्यांना हुसकावून घराबाहेर काढून बेघर केले जाते, अशी खंत शिष्टमंडळाने व्यक्त केली. या रहिवाशांना निर्मलनगरमध्येच कायमस्वरुपी घरे देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यानुसार जयस्वाल यांनी अ वर्गातील मूळ भाडेकरुंना निर्मलनगरमध्येच कायमस्वरुपी घरे देण्याची मागणी तत्वत: मान्य केल्याची माहिती दुरूस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. भाडेकरुंना कायमस्वरुपी घरे देण्यासंबंधीच्या राज्य सरकारच्या २०१९ च्या शासन निर्णयानुसार ही मागणी तत्वत: मान्य करण्यात आली. आता लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मूळ भाडेकरुंना कायमस्वरुपी निर्मलनगरमध्ये घरे मिळणार असली तरी ब वर्गातील खरेदी-विक्री केलेले रहिवाशी आणि क वर्गातील घुसखोरांना निर्मलनगरमधील पुनर्वसित इमारतीत संक्रमण शिबिराचे गाळे म्हणूनच घरे दिली जाणार आहेत. ब आणि क मधील रहिवाशांबाबतचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशास आधीन राहत त्यांच्याबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही यावेळी जयस्वाल यांनी बैठकीत स्पष्ट केल्याचे शंभरकर यांनी सांगितले. जयस्वाल यांच्या निर्णयावर संक्रमण शिबिरार्थींनी समाधान व्यक्त केले.

Story img Loader