लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : काळाचौकी येथील अभ्युदनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सध्या निविदा प्रक्रिया सुरु आहे. या निविदा प्रक्रियेस अखेर आता ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अभ्युदय नगर वसाहतीचा रखडलेला पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावला जात आहे. ३३ एकर जागेवरील ४९ इमारतींच्या पुनर्विकासाअंतर्गत ३३५० कुटुंबांना अंदाजे ६३५ चौ. फुटाचे घर दिले जाणार आहे. मोतीलाल नगरच्या धर्तीवर कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेन्ट एजन्सीची अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती करत म्हाडाच्या माध्यमातून हा पुनर्विकास केला जाणार आहे. या पुनर्विकासातून मुंबई मंडळाला ४० हजार चौ.मीटर क्षेत्रफळ आणि सुमारे ८०० कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. अशा या पुनर्विकासासाठी मंडळाने विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याआधी १० ऑक्टोबरला निविदा प्रसिद्ध केली होती.

आणखी वाचा-आरोग्य केंद्रातील सहाय्यक परिचारिका प्रसविकांना दिलासा

निविदेप्रमाणे २२ नोव्हेंबरला निविदा सादर करण्याची अंतिम तारीख होती. मात्र आचारसंहिता, निवडणुकीची धामधूम लक्षात घेता निविदेला मुदतवाढ देण्यात आली होती. हि मुदतवाढ शुक्रवार संपुष्टात आली असली असून ही मुदत संपुष्टात येण्याआधीच निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे. ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता इच्छुक ३० डिसेंबरपर्यंत निविदा सादर करता येणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान येत्या एक-दोन महिन्यात निविदेस अंतिम स्वरुप देत पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे मंडळाचे नियोजन आहे.

Story img Loader