लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेसाठी मेट्रो गाडीचे १०८ डबे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल ९८९ कोटी रुपये खर्च करून हे डबे खरेदी करण्यासाठी एमएमआरडीएने निविदा जारी केली आहे.

पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या १५.३१ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे बांधकाम एमएमआरडीए करीत आहे. या मार्गिकेवर १३ मेट्रो स्थानकांचा समावेश असून सुमारे ६,६७२ कोटी खर्च करून ही मार्गिका बांधण्यात येत आहे. ही मार्गिका २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. महत्त्वाचे म्हणजे या मार्गिकेतील वादग्रस्त ठरलेल्या कारशेडचा प्रश्नही मार्गी लागला आहे. लवकरच कारशेडच्या कामासाठी निविदा मागविण्यात येणार आहे. त्याचबरोबर नियोजित वेळेत ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी मेट्रो गाड्यांची खरेदी, त्यांची चाचणी आदी कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यानुसार एमएमआरडीएने आता मेट्रोचे डबे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

आणखी वाचा-Video : मुंबईकरांनो काळजी घ्या! आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, ‘बिपरजॉय’मुळे वरळी सीफेसला उधाण

‘मेट्रो ६’साठी १०८ डबे खरेदी करण्यासाठी नुकतीच एमएमआरडीएने निविदा जारी केली आहे. डब्यांची बांधणी, डब्यांचा पुरवठा, त्यांची चाचणी, तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदार कंपनीवर असणार आहे.