मुंबई: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाला गती दिली जात असून त्या कामासाठी एखाद्या कंपनीची निवड करून पाच महिन्यात काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. देशभरातील १४ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून  त्यात सीएसएमटी स्थानकाचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> दिवाळीच्या दिव्यामुळे आग लागल्याने भाजलेल्या मुलीचा अखेर मृत्यू

सप्टेंबर 2022 च्या अखेरीस केंद्रीय मंत्रिमंडळात अहमदाबाद, नवी दिल्लीसह सीएसएमटी स्थानकांच्या पुनर्विकास कामांसाठी एकूण दहा हजार कोटी रुपयांचा निधी देण्यास मंजुरी देण्यात आली होती.  हा पुनर्विकास अडीच वर्षात केला जाणार असल्याचेही स्पष्ट केले होते. त्यानंतर निविदा प्रक्रियेलाही गती दिली जाणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. आता विकासासाठी हायब्रीड बील्ड ॲापरेट पद्धत अवलंबवली जाणार आहे. यामध्ये रेल्वे ४० टक्के आणि खासगीची ६० टक्के गुंतवणुक असेल. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारतीय रेल्वेत आधुनिक सुविधा देण्यासाठी ४० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> मुंबई : सेंच्युरी मिल संक्रमण शिबिर परिसरातील खड्डयात पडून बीडीडीवासीयाचा मृत्यू

देशभरातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासामुळे अर्थव्यवस्थेत वाढीव रोजगार निर्मिती आणि उत्पन्नही मिळणार आहे.

या स्थानकांच्या पुनर्विकासामध्ये प्रशस्त रूफ प्लाझा, फूड कोर्ट, प्रतीक्षालय, मुलांसाठी खेळण्याची जागा, स्थानिक उत्पादनांसाठी नियुक्त जागा इत्यादी सुविधांची तरतूद करण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. या विकासामुळे रेल्वे स्थानकासह मेट्रो, बस वाहतुकीच्या विविध पद्धती जोडल्या जाणार आहेत. स्थानकाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात अपंगांसाठी’ सुविधांचा  समावेश असेल. स्थानकाच्या पुनर्विकासामुळे रेल्वे प्रवाशांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी स्थानकावर ‘सिटी सेंटर’ सारखी जागा निर्माण होणार असल्याचेही सांगण्यात आले.

सीएसएमटी पुनर्विकास कसा असेल ?

– सीएसएमटी स्थानकातील सोयीसुविधांमध्ये वाढ करुन ते अधिक कार्यक्षम करणे.

– या स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये आगमन आणि निर्गमनाचे वेगळे विभाग करणे, स्थानक दिव्यांगाना वापरता येण्यासारखे करणे, प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी उपलब्ध करुन देणे, ऊर्जा बचत करणाºया पर्यायांचा अवलंब करणे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tender process for csmt redevelopment likely to completed in five months mumbai print news zws