मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ प्रकल्पातील कांजूरमार्ग कारशेडची जागा ताब्यात आल्यानंतर तिच्या बांधकामासाठी निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. महिन्याभरात कांजूरमधील कारशेडसाठी निविदा जारी करण्यात येण्याची शक्यता आहे.

‘मेट्रो ६’ मार्गिकेतील कारशेड कांजूरमार्ग येथे प्रस्तावित करून २०१६ मध्ये त्यास राज्य सरकारने मंजुरी दिली. मात्र ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ची कारशेड कांजूरमार्गला हलविल्यानंतर मोठा वाद सुरू झाला होता. या वादात ‘मेट्रो ६’ची कारशेडही अडकली. एकीकडे ‘मेट्रो ६’चे काम सुरू असताना आणि २०२५ मध्ये ही मार्गिका सेवेत दाखल करण्याचे नियोजन असताना कारशेड मात्र अडकली होती. त्यामुळे एमएमआरडीएने राज्य सरकारकडे पाठपुरावा करून कांजूरच्या जागेसाठी आग्रह धरला होता. अखेर एमएमआरडीएच्या पाठपुराव्याला यश आले. एप्रिलमध्ये कांजूरमार्गची १५ हेक्टर जागा एमएमआरडीएला हस्तांरित करण्यात आली.वैद्यकीय विभागातील वर्ग ३ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरच भरणार

Executive Director of Konkan Irrigation Development Corporation approved two year plan to supply 500 million liters of daily water
भिरा’च्या पाणी प्रस्तावाला गती,शासन मंजुरीनंतर पनवेल महापालिकेचा ३४०० कोटींचा खर्च
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
What is the solution to the Ghodbunder road traffic
घोडबंदर रस्त्याच्या कोंडीवर उपाय काय? नवे ठाणे कोंडीचे का ठरू लागलेय? 
incomplete work of first phase of concreting road complete by may 2025
सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मे २०२५ ची मुदत; कामे पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश
Rehabilitation people Metro 3 route, Metro 3,
मुंबई : मेट्रो ३ मार्गिकेतील ५७६ प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन कासवगतीने, परिणामी पुनर्वसित इमारतींच्या खर्चात भरमसाठ वाढ
By way of 22 stalled redevelopment projects of cessed buildings
उपकरप्राप्त इमारतींचे रखडलेले २२ पुनर्विकास प्रकल्प मार्गी
Thane Khadi Coastal Road Project,
ठाणे खाडी किनारा मार्ग प्रकल्प : प्रकल्पासाठीचे ९२ टक्के भूसंपादन पूर्ण, उर्वरित आठ टक्के भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती

हेही वाचा >>>वैद्यकीय विभागातील वर्ग ३ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरच भरणार

ही जागा ताब्यात आल्यानंतर १५ दिवसांत, एप्रिल अखेरीस वा मेच्या पहिल्या आठवड्यात कारशेडच्या बांधकामासाठी निविदा जारी करण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. पण आता निविदा जारी होण्यासाठी आणखी महिनाभराचा काळ लागणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. निविदा काढण्याची तयारी सुरू आहे. मात्र सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून निविदा जारी करण्यासाठी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे निविदा महिन्याभरात जारी होईल. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून कारशेडच्या कामाला सुरुवात होईल. बांधकाम सुरू झाल्यापासून ३० महिन्यात कारशेड पूर्ण करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.