कोणीतरी सोशल नेटवर्किंग साईट्सवर प्रक्षोभक ‘पोस्ट’ प्रसिद्ध केल्यामुळे संवेदनशील अशा भिवंडीमध्ये गुरुवारी सकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय दंडविधान संहिता आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल केलाय. 
अफताब हुसेन शेख यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंडविधान संहितेच्या २९५ आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या ६७ ए कलमानुसार भिवंडी शहर, भोईवाडा आणि राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. प्रक्षोभक ‘पोस्ट’बद्दल माहिती समजल्यावर अनेक तरुण गुरुवारी सकाळी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अतिशय संवेदनशील असलेल्या भिवंडीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तेथील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आलीये. रस्त्यावर उतरलेल्या काही समाजकंटकांनी गाड्याची तोडफोड केली असल्याची माहिती समजते. मात्र, अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ठाण्याचे पोलिस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी स्वतः भिवंडीमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

Story img Loader