Chunabhatti viral video: मुंबई लोकलला मुंबईकरांची लाईफलाईन म्हटले जाते. लाखो मुंबईकर रोज लोकलमधून प्रवास करतात. त्यामुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते आणि या गर्दीमुळे अनेकदा प्रवाशांना नाहक त्रास भोगावा लागतो. काहींना अपघातात प्राण गमवावे लागतात. पण असेही काही प्रसंग आहेत. जेव्हा रेल्वे सुरक्षा दल, पोलीस कर्मचारी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवला आहे. मुंबईच्या चुनाभट्टी रेल्वे स्थानकावर अशीच एक घटना घडली आहे. एका महिलेला ट्रेनमधून पडताना महिला पोलीस हवालदाराने वाचविले. यावेळी महिला हवालदारही खाली पडली. काळजाचा ठोका चुकविणारा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हार्बर रेल्वेच्या चुनाभट्टी रेल्वे स्थानकावर एक महिला प्रवाशी उतरत असताना तिचा ड्रेस लोकलमधील दुसऱ्या एका महिला प्रवाशाच्या बॅगेच्या चॅनमध्ये अडकला. यामुळे खाली उतरणाऱ्या महिलेचा तोल जाऊन ती धावत्या लोकलबरोबर खेचली गेली. लोकल सुरू झाल्यामुळे तिला लोकलमध्ये चढताही येईना आणि ड्रेस सोडविता येईना. त्यामुळे महिला चालत्या ट्रेनबरोबर धाऊ लागली.

या महिला कधी सुधारणार? फक्त हात लागला म्हणून जोरदार बाचाबाची; इंग्रजीत सुरु झालेलं भांडण हिंदीवर गेलं, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Shocking video a Lady Ran away after hitting a Pedestrian with Scooter in Indonesia
माणुसकी संपली! तरुणीनं रस्त्यानं जाणाऱ्या महिलेला धडक दिली अन् मदत करायची सोडून काय केलं पाहा; संतापजनक VIDEO व्हायरल
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
Society confronts reality Water cut for six days
समाज वास्तवाला भिडताना : सहा दिवस पाणी बंद…
Domino Effect Crash Sudden Scooty Brake Causes Multi-Vehicle Pileup Internet Reacts WATCH
“वो स्त्री है कुछ भी कर सकती है…” भररस्त्यात दुचाकीस्वार काकूंनी अचानक मारला ब्रेक, एकमेकांना धडकल्या मागून येणाऱ्या गाड्या, विचित्र अपघाताचा Video Viral
Rickshaw driver arrested , molesting woman ,
पुणे : प्रवासी महिलेचा विनयभंग करणारा रिक्षाचालक अटकेत
viral video unhealthy vegetables flower selling in market with chemical shocking video goes viral on social media
आता तर हद्दच पार केली! महिलांनो ‘हा’ VIDEO पाहिला तर यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल

सदर घटना दि. ६ फेब्रुवारी रोजी दुपारच्या वेळेस घडली असून सीसीटीव्हीमध्ये हा थरार कैद झाला आहे. महिला लोकलबरोबर फरफटत जात असताना प्लॅटफॉर्मवरील प्रवाशी सदर महिलेला वाचविण्यासाठी धाव घेतल्याचे दिसते. तसेच काही अंतरावर महिला हवालदार रुपाली कदम उभ्या असतात. महिला प्रवाशी लोकलबरोबर फरफटत येत असल्याचे पाहून त्या विनाविलंब तिला बाजूला करतात. मात्र यात दोघीही प्लॅटफॉर्मवर कोसळतात. लगेच प्लॅटफॉर्मवर उभे असलेले इतर प्रवाशी त्यांना लोकलपासून मागे खेचून घेतात.

दरम्यान मोटरमनही लोकल पुढे जाऊन थांबविल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. महिला हवालदार रुपाली कदम यांनी वेळीच धाडस दाखवून सदर महिलेला खेचल्यामुळे पुढील अनर्थ टळत प्रवाशाचे प्राण वाचले. कर्तव्य बजावत असताना स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता रुपाली कदम यांनी जे करून दाखवले त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Story img Loader