देशातील काही महत्त्वाच्या व्यक्तींना जीवे मारण्याच्या कटात सामील असल्याचा आरोप असलेल्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने(एनआयए) मुंबई विमानतळावर अटक केली आहे. असदुल्ला खान(५७) असे या दहशतवाद्याचे नाव असून, त्याला ‘एनआयए’च्या पथकाने पुढील तपासासाठी बंगळुरूला नेले आहे.
‘तोयबा’शी संबंधित बंगळुरूतील कटकारस्थानाप्रकरणी एनआयए असदुल्लाच्या मागावर होती. बंगळुरू आणि हुबळीतील अनेक धार्मिक नेते, पत्रकार तसेच राजकीय नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यासाठी एनआयएचे पथक त्याला बंगळुरूला घेऊन गेले आहे.

Story img Loader