त्वचा उजळ करण्याचा दावा करणा-या लॉरिएल या कंपनीच्या उत्पादनांमध्ये पारा आढळला आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने लॉरिएलच्या पाच उत्पादनांची तपासणी केल्यावर ही माहिती समोर आली आहे. त्वचेवर लावल्या जाणा-या क्रीममध्ये पारा असल्यास मूत्रपिंड निकामी होण्याचा आणि त्वचेसंबंधी आजार होण्याची शक्यता असते असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे लॉरिएल कंपनी अडचणीत सापडली आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार लॉरिएल कंपनीच्या चाकणमधील प्रकल्पातून अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नमुने घेतले होते. यातील पाच नमुन्यांमध्ये पा-याचे प्रमाण ०.६ पार्टस् पर मिलीयन (पीपीएम). १.०२ पीपीएम, १.६९ पीपीएम, १.८७ पीपीएम, २.३८ पीपीएम ऐवढे असल्याचे निष्पन्न झाले. लॉरिएलच्या गार्नियर मेन पॉवर लाइट इंटेन्सिव्ह फेअरनेस फेसवॉश, गार्नियर मेन पॉवर लाइट स्वेट प्लस ऑइल कंट्रोल फेअरनेस मॉइश्चराइजर, लॉरिएल पर्ल परफेक्ट फेअरनेस क्रिम (नाईट), लॉरिएल परफेक्ट फेअरनेस प्लस मॉइश्चराइजिंग क्रिम (डे) आणि लॉरिएल पर्ल परफेक्ट रि लायटनिंग व्हाईटिंग फोम या पाच उत्पादनांमध्ये पारा आढळला आहे. एप्रिलसमध्ये या क्रीमचे उत्पादन झाले होते. भारतातील औषध आणि सौंदर्य उत्पादन नियमावली १९४५ नुसार पारा असलेल्या सौंदर्य उत्पादन तयार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यातील एफडीएच्या तपासणीत पा-याचे प्रमाण जास्त आढळले असले तरी फ्रान्समध्ये लॉरिएलच्या उत्पादनात पा-याचे प्रमाण हे नोंदही घेता येत नव्हती इतके आढळले आहे. महाराष्ट्र एफडीएचा एप्रिल २०१६ मधील अहवाल हा फ्रान्स, जर्मनी, जपान आणि सिंगापूर या देशांमधील तपासणी अहवालापेक्षा वेगळा आहे. या सर्व देशांमध्ये आमच्या उत्पादनांमध्ये पा-याचे प्रमाण नोंद घेण्याइतपतही नव्हते असे समोर आले होते असा दावा कंपनीच्या प्रवक्त्यांनी केला आहे. एक जबाबदार कंपनी म्हणून आम्ही भारत किंवा जगभरातील कोणत्याही देशातील उत्पादनांमध्ये पारा वापरत नाही. आम्ही महाराष्ट्र एफडीएच्या अहवालाला कोलकाता येथील केंद्रीय तपासणी केंद्रात आव्हान दिले आहे असेही प्रवक्त्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार त्वचेचा रंग उजळण्यासाठी लावण्या जाणा-या क्रिममध्ये पारा वापरल्यास त्यामुळे प्रामुख्याने मूत्रपिंडासंबंधीचे आजार बळावतात. त्याशिवाय त्वचेचा रंग जाणे, त्वचेवर चट्टे येणे यासारखे त्वचासंबंधीच्या समस्याही निर्माण होतात. तसेच पारा हा विष असल्याने त्याचा परिणाम शरीराच्या मज्जासंस्थेवरदेखील होतो.

एफडीएनेदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रकरणाविषयी माहिती देताना एफडीएचे आयुक्त हर्षदीप कांबळे म्हणाले, आम्ही प्रत्येक उत्पादनाचे नमुने गोळा करत असतो. उत्पादनात नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यावर निरीक्षकांनी संबंधीत उत्पादन परत मागवण्याचे आदेश दिले होते असे त्यांनी सांगितले. गेल्या सात वर्षात लॉरिएलच्या विक्रीत भरभरुन वाढ झाली आहे. २०२० पर्यंत १५ कोटी भारतीयांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दीष्ट आहे.

Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Viral video of a man carries a snake to the hospital after it bites him
सापाने दंश केला तरी जगण्याची इच्छा सोडली नाही, रुग्णालयात सापाला घेऊन आला अन्…, VIDEO पाहून माणसाच्या हिमतीला कराल सलाम
JEE Advanced 2025 New Eligibility Rules
JEE Advanced 2025 : जेईई ॲडव्हान्स्डच्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
check your PF balance instantly without UAN Number
EPF missed call service: UAN नंबरशिवाय तपासू शकता PF बॅलेन्स, जाणून घ्या सोपी पद्धत
peticoat cancer
साडी नेसणार्‍या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?
New Spider Species Baner Hill, Baner Hill,
कोळ्याच्या नवीन प्रजातीचा बाणेर टेकडी येथे शोध, काय आहे वेगळेपण?