शिक्षकांच्या नियुक्तीकरिता घेण्यात येणारी पहिलीवहिली शिक्षक पात्रता परीक्षा राज्यभरात सुरळीतपणे पार पडली. राज्यभरातून सव्वा सहा लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली.
तब्बल एक हजार ९९६ परीक्षा केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. विदर्भातून सर्वाधिक एक लाख ५४ हजार उमेदवार टीईटीला बसले होते.
 ही परीक्षा पहिली ते आठवीपर्यंतच्या व डीएड-बीएड अभ्यासक्रमावर आधारलेली असेल, असे सांगण्यात आले होते. परंतु, तरीही परीक्षेच्या स्वरूपाबाबत असलेल्या संदिग्धतेमुळे उमेदवारांमध्ये गोंधळ होता. त्यामुळे, काही अनपेक्षित प्रश्नांना उमेदवारांना तोंड द्यावे लागले. खासकरून गणिताचा पेपर कठीण असल्याची प्रतिक्रिया उमेदवारांकडून व्यक्त होते आहे. हिंगोलीत बनावट पेपर विकणाऱ्यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ही परीक्षा घेण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा