मुंबई : ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह तीन आमदारांना अपात्र ठरवावे म्हणून शिवसेनेच्या ठाकरे गटाने विधिमंडळ सचिवालयाकडे पत्र सादर केले. तसेच राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कारवाईची मागणी केली. याच मुद्दय़ावर विधान परिषदेत गदारोळ झाला.
गोऱ्हे यांच्याबरोबर आमदार मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांना अपात्र करण्यासाठी विधिमंडळ सचिवालयाकडे उद्धव ठाकरे गटाने पत्र सादर केले. गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या संवैधानिक पदावर राहून योग्य न्याय करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना पदावरून हटविण्यात यावे. या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली. गोऱ्हे या उपसभापती असून, सभापतीपद रिक्त आहे. यामुळे गोऱ्हे यांच्या विरोधातील याचिकेवर कोण निर्णय घेणार, असा सवाल ठाकरे गटाने व्यक्त केला. तसेच ठाकरे गटाच्या आमदारांनी राज्यपाल बैस यांची भेट घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली.
उपसभापतीपद हे सांविधानिक पद असून त्या पदावरील व्यक्तीस पक्षपातीपणा करता येत नाही. सभापतींना कोणताही पक्ष नसतो. यासंदर्भात माझ्याकडे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे आणि विधान परिषदेच्या कामकाजाचे इतिवृत्त आहे. त्यामुळे त्यांचे उपसभापतीपद रद्द केले जावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांनी केली. ठाकरे गटाचे अनिल परब यांनीही अशीच मागणी केली. त्यावर सभागृहात उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत विरोध केला. उपसभापतीविरोधात विरोधी पक्ष नियमानुसार अविश्वास ठराव आणू शकतात, असे आव्हान फडणवीस यांनी पाटील यांना दिले. दोन्ही बाजूच्या आमदारांचा गोंधळ सुरू असताना गोंधळातच कामकाज उरकण्यात आले.
गोऱ्हे यांना उपसभापतीपदावरून हटवावे या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल बैस यांची भेट घेतली. उपसभापती यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या पदावर राहून न्याय देऊ शकत नाहीत, अशी विनंती राज्यपालांना केली असून त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. तसेच हा पेच सुटेपर्यंत राज्यपालांनी एक समिती नेमावी आणि कामकाज चालवावे अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, राजेश टोपे, अनिल देशमुख, काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.