शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात शाब्दिक युद्ध सुरू आहे. शीतल म्हात्रेंनी ठाकरे गटाला लक्ष्य करत टीका केली. तसेच त्यांचा व्हिडीऑ मॉर्फ केल्याचा आरोप करत पोलीस तक्रार केली. यानंतर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले. त्यानंतर काही जणांना अटक झाली. यात ठाकरे गटातील साईनाथ दुर्गे नावाच्या कार्यकर्त्याचाही समावेश आहे. यानंतर आता ठाकरे गटानेही याला प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनोद घोसाळकर म्हणाले, “शीतल म्हात्रे म्हणतात माझ्या व्हिडीओशी छेडछाड केली, मॉर्फिंग केलं. त्याबाबत पोलिसांकडे गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली. आमचा साईनाथ दुर्गे नावाचा कार्यकर्ता दोन दिवस बंगळुरूमध्ये बहिणीकडे गेला होता. त्याला विमानतळावरून अटक केली. हे काय सुरू आहे.”

“मग तो व्हिडीओ डिलीट का केला?”

“शीतल म्हात्रेंचं म्हणणं इतकंच आहे की, त्या व्हिडीओशी छेडछाड झाली आहे. असं असेल तर पोलिसांनी तपासावं. राजू सुर्वेंच्या फेसबुकवरून त्या मिरवणुकीचं लाईव्ह प्रक्षेपण केलं होतं. लाईव्हमध्ये तोच व्हिडीओ होता. मग तो व्हिडीओ डिलीट का केला?”, असा सवाल विनोद घोसाळकर यांनी विचारला. यावेळी त्यांनी दहिसर पोलीस स्टेशनला शीतल म्हात्रेंविरोधात तक्रार दिल्याचीही माहिती दिली.

शीतल म्हात्रेंच्या व्हायरल आक्षेपार्ह व्हिडीओवर अजित पवारांची प्रतिक्रिया

अजित पवार म्हणाले, “राजकीय क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करताना स्वतःचं चारित्र्य चांगलं ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. कारण लोक आमच्याकडे ‘पब्लिक फिगर’ म्हणून पाहत असतात. त्यामुळे राजकीय मतं वेगवेगळी असू शकतात, मतमतांतरं असू शकतात. त्याबद्दल मला खोलात जायचं नाही.”

हेही वाचा : शीतल म्हात्रेंच्या आक्षेपार्ह व्हिडीओवर रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मिरवणुकीत असं कोणतंही कृत्य…”

“‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झालं पाहिजे”

“कुठल्याही लोकप्रतिनिधीने काही केलं नसताना कुणी जाणीवपूर्वक असे प्रकार केले, त्यामागे कुणी मास्टरमाईंड असेल, तर आमचं स्पष्ट मत आहे की, याची चौकशी झाली पाहिजे. ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झालं पाहिजे. वस्तूस्थिती काय आहे हे लोकांना आणि सभागृहाला कळली पाहि,” अशी मागणी अजित पवारांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray faction leader ask why they deleted facebook live video of sheetal mhatre pbs
Show comments