राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना काल उधाण आले होते. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. मात्र, त्यानंतर अजित पवारांनी, “या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही”, अशी स्पष्टोक्ती दिली. दरम्यान, यावरून आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने भाजपावर टीकास्र सोडलं आहे. अजित पवारांविरोधात वावड्या उठवून वातावरण गढूळ करण्याचे काम भाजपानेच केलंय, असं ते म्हणाले. ठाकरे गटाने मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातून ही टीका करण्यात आली.

हेही वाचा – विश्लेषण: अजितदादांबाबत नव्या समीकरणांची चर्चा का सुरू आहे?

Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Uddhav Thackeray and rahul gandhi
इंडिया आघाडीत बिघाडी? विसंवादावरून ठाकरे गटाची काँग्रेसवर तोफ; म्हणाले, “हेवेदावे, जळमटे अन् कुरघोड्यांना…”
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Amit Deshmukh On BMC Election 2025
Amit Deshmukh : ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसची भूमिका काय? अमित देशमुखांचं मोठं भाष्य; म्हणाले, “आम्ही देखील…”
Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांनी दिलं राजकीय उत्तर; म्हणाले, “राजकारणात काहीही…”

ठाकरे गटाने नेमकं काय म्हटलंय?

“भाजपाकडे स्वतःचं असं काहीही नाही. दुसऱ्या पक्षांतले लोक उधार घेऊन ते स्वतःचा पक्ष चालवत आहेत. कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून स्वतःचे घर भरतात. काँग्रेसवरही त्यांची वाईट नजर आहेच. धमक्या, दबाव आणि तपास यंत्रणांची सुरामारी यामुळे महाराष्ट्रासह देशात लोकशाही तसेच कायद्याचे राज्य संपवून टाकलं. अजित पवारांच्या बाबतीत वावड्या आणि रेवड्या उठवून वातावरण गढूळ करण्याचे काम भाजपानेच केले. महाराष्ट्राला अस्थिर, बदनाम व गोंधळ निर्माण करण्याचे हे कारस्थान आहे. बरे झाले, अजित पवार यांनीच हे कारस्थान उधळून लावले. त्यामुळे तूर्तास तरी या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे”, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – “…म्हणून अजितदादा राऊतांवर चिडले”, अजित पवारांच्या स्पष्टीकरणावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“वावड्या उठवणाऱ्यांनी राजकीय भान ठेवायला हवं”

“अजित पवार हे मंगळवारी सकाळी विधान भवनातील त्यांच्या कार्यालयात गेले व तेथे त्यांना त्यांच्या पक्षाचे आमदार भेटायला आले. यात नवल ते काय? अजित पवार हे विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत व पक्षाचे बरेचसे काम तेच पाहतात. त्यामुळे वावड्या उठवणाऱ्यांनी राजकीय भान ठेवायला हवे”, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

हेही वाचा – “जिवात जीव असेपर्यंत…”; बंडखोरीचा दावा फेटाळताना अजित पवार नेमकं काय म्हणाले? दिवसभरातील घटनाक्रमही सांगितला

चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलारांवर खोचक टीका

पुढे बोलताना त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार आशिष शेलार यांच्यावरही खोचक शब्दांत टीका केली आहे. “भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे एक गंमतीशीर गृहस्थ आहेत व त्यांच्या विधानांकडे निव्वळ गंमत म्हणूनच पाहावे लागेल. आता बातमी आली की, महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या भाजपा नेत्यांना दिल्लीत महत्त्वाच्या बैठकीसाठी तातडीने बोलावले. आता हे महत्त्वाचे नेते कोण, तर बावनकुळे व आशीष शेलार. म्हणजे अजित पवारांसारखा बलदंड नेता ४० आमदारांसह भाजपात प्रवेश करतोय आणि त्याबाबत चर्चा करायला कोण दिल्लीत जात आहेत, तर हे दोन ‘वेलदोडे’. तेव्हा कोणत्या वावड्या किती गांभीर्याने घ्यायच्या? याचा विचार करायला हवा”, असं ते म्हणाले.

Story img Loader