केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्षनाव व ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभारला आहे. अशातच आता ठाकरे गटाला मिळालेल्या ‘मशाल’ चिन्हावर समता पार्टीने दावा केला असून ते याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. दरम्यान, यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी समता पार्टीला खतपाणी कोण घालत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – MPSC ऐवजी ‘निवडणूक आयोग’ असा उल्लेख; CM शिंदेंकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “दिवसभर…”

काय म्हणाले अनिल देसाई?

समता पार्टी काय करत आहे. त्यांना कोण खतपाणी घालत आहे. या गोष्टीवर बोलण्यात अर्थ नाही. निवडणूक आयोगाने आमचं चिन्ह गोठवल्यानंतर आम्हाला मशाल हे चिन्ह दिलं. याच चिन्हावर आम्ही पोटनिवडणूक जिंकलो. त्यामुळे लोकशाहीच्या मार्गावर अशाप्रकारे कोणी रोडे घालत असतील, तर हे लोकशाहीसाठी योग्य नाही, अशी प्रतिक्रिया खासदार अनिल देसाई यांनी दिली.

हेही वाचा – “शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांची भीती वाटत होती, कारण…”, बावनकुळेंचं थेट विधान!

निवडणूक आयोगाने जेव्हा आम्हाला मशाल हे चिन्ह दिलं. त्यावेळी समता पार्टीचं अस्थित्व, त्याचं चिन्ह कधी गोठवण्यात आलं, ते कधी फ्री करण्यात आलं. याची संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे जेव्हा आम्हाला हे चिन्ह दिलं, तेव्हा कोणीतरी येतं आणि त्या चिन्हावर दावा सांगतो, हे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण टीकणार नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – VIDEO: कोल्हापुरात दाखल होताच किरीट सोमय्यांचा हसन मुश्रीफांवर गंभीर आरोप, म्हणाले, “५०० कोटी…”

यावेळी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीबाबतही प्रतिक्रिया दिली. “आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. दोन्ही बाजूंकडून सविस्तर भूमिका मांडली जाईल. त्यानंतरच न्यायालय निकाल देईल. पण निर्णय लगेच लागण्याची शक्यता कमी आहे. कदाचित मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्णय येण्याची शक्यता आहे”, असं ते म्हणाले.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी होईपर्यंत मशाल चिन्ह ठाकरे गटाकडेच राहिल, असा निर्णय दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group leader anil desai reaction on samata party plea in sc for mashal sign spb