मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी सभागृहात केलेल्या शिवीगाळ प्रकरणी त्यांचे पाच दिवसाकरिता निलंबन करण्यात आल्याने परिषदेच्या कामकाजावर ठाकरे गटाने अघोषित बहिष्कार टाकला होता. तालिका सभापती अमोल मिटकरी यांनी सकाळी लक्षवेधी पुकारुन कामकाजाला सुरुवात केली. त्यावेळी ठाकरे गटाचे, सदस्य अॅड. अनिल परब यांची लक्षवेधी असताना ते गैरहजर होते.

दुपारनंतर अॅड. परब यांनी दानवे यांचे निलंबन रद्द करण्यात यावे, यासाठी सभागृहात भारतीय बैठक मारली. लक्षवेधी झाल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केल्यानंतर भारतीय बैठक मारणाऱ्या ठाकरे गटाच्या सदस्य पुन्हा बाहेर गेले. त्यामुळे दानवे यांच्या निलंबनावर ठाकरे गटाने अघोषित बहिष्कार टाकल्याचे चित्र होते. महाविकास आघाडीच्या काही सदस्यांनी त्यांना या बहिष्कारात साथ दिली. विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड शिवीगाळ प्रकरणी दानवे यांचे मंगळवारी पाच दिवसाकरिता निलंबन झाले आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray in Nashik : “निवडणुका म्हणजे तुम्हाला सांगतो…”, प्रचारसभांना कंटाळून राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Raj Thackeray Criticized Sharad Pawar Again
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “शरद पवार हे तालुक्याचे नेते, जाणते राजे वगैरे..”
Sharad Pawar and Raj Thackeray meeting in Khadakwasla and Hadapsar Constituency
हडपसर, खडकवासला मतदारसंघात पवार ठाकरेंच्या तोफा धडाडणार, एकमेकांना काय उत्तर देणार !
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची टीका, “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला..”
raj thackeray criticized uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “उद्धव ठाकरेंकडून बाण गेला आणि फक्त खान राहिले आहेत, कारण..”

हेही वाचा >>>मराठा आरक्षण : मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्याबाबतच्या मुद्यावर अखेर पडदा, आयोगाला आरोपांबाबत १० जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

आज सकाळी विधानपरिषदेचे कामकाज विशेष बैठकीने सुरू झाले. सभागृहात विरोधी पक्षनेता नसल्याने महाविकास आघाडीचे सदस्य सभागृहाबाहेर चर्चा करीत होते. याच काळात तीन लक्षवेधी पुकारण्यात आल्या. दुपारनंतर अॅड. परब यांनी विरोधी पक्षनेत्याचे निलंबन ही या सभागृहातील पहिलीच घटना आहे. हे निलंबन योग्य वाटत नाही. दानवे यांनी केलेल्या शिवीगाळ प्रकरणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माता भगिनींची माफी मागितली आहे. तेव्हा त्यांचे निलंबन रद्द करण्यात यावे. सभापती निर्णय घेत नाहीत. तोपर्यंत सभागृहात ठिय्या मांडणार असल्याचे जाहीर करून परब आणि महाविकास आघाडीचे सदस्य खाली बसले. प्रश्नोत्तरे झाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्यानंतर हे खाली बसलेले सदस्य पुन्हा बाहेर गेले.