मातोश्रीची सुरक्षा अभेद्य असल्याचा पोलिसांचा दावा फुसका असून ही सुरक्षा व्यवस्था भेदणे सहज शक्य होते, असा दावा मुंबईवरील पाकिस्तानी हल्ल्यामागचा प्रमुख सूत्रधार डेव्हीड हेडली याने केला होता. ‘मातोश्री’ची सुरक्षा अभेद्य असल्याचा दावा पोलीस कसे करतात, याचे आपल्याला आश्यर्च वाटत असल्याचे हेडलीने चौकशीत म्हटल्याचे लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या ‘हेडली अँड आय’ या पुस्तकात म्हटले आहे.
मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यापूर्वी कोणकोणत्या ठिकाणी हल्ले करता येतील याची पाहणी डेव्हिड हेडली याने केली होती. दादर येथील शिवसेना भवनात जाऊनही त्याने पाहणी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. मात्र ‘मातोश्री’ या निवसेनाप्रमुखांच्या निवासस्थानी त्यांचा चाहता म्हणून हेम्डली २००८ साली पोहोचल्याचे व तेथे पंधरा मिनिटे छायाचित्रण केल्याचे या पुस्तकाच्या रुपाने प्रथमच स्पष्ट होत आहे. व्यायामपटू व शिवसैनिक असलेल्या विलास नावाच्या तरुणाच्या मदतीने हेडली ‘मातोश्री’मध्ये पोहोचू शकल्याचे या पुस्तकात म्हटले असून चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांचा मुलगा राहुल यांच्या व हेडलीच्या मैत्रीचेही दालन या पुस्तकात उघडण्यात आले आहे. पुस्तकाच्या लेखकाच्या म्हणण्यानुसार ‘मातोश्री’च्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीही हेडलीने हुडकल्या होत्या. हेडलीचे हे निवेदन अमेरिकेच्या ‘नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ने ध्वनिमुद्रीत के ल्याचा दावाही लेखकाने केला आहे. ‘मातोश्री’मधील बाळासाहेब ठाकरे यांची सुरक्षा व्यवस्था भेदणे ही क्षुल्लक बाब असून सुरक्षा व्यवस्था अभेद्य असल्याचा दावा पोलीस कसे काय करतात याबाबतही हेडली याचे आश्चर्य व्यक्त केले.           

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा