शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी कोल्हापुरातील एका तरुणाने पायी तर दुसऱ्याने सायकलवरून ‘महालक्ष्मी ते मातोश्री’ असा प्रवास केला. बाळासाहेबांच्या प्रकृती बिघडल्याचे वृत्त आल्यानंतर १० नोव्हेंबर रोजी हातकणंगले तालुक्यातील पांडुरंग भोंगार्डे व चंद्रकांत तोर्लेकर या दोन तरुणांनी शिवसेनाप्रमुख बरे व्हावेत, यासाठी महालक्ष्मी ते मातोश्री असा प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोल्हापुरात महालक्ष्मीचे दर्शन घेऊन भोंगार्डे यांनी पायी तर तोर्लेकर यांनी सायकलवरून प्रवास सुरू केला. शुक्रवारी सायंकाळी ते वांद्रय़ात पोहोचले. नंतर त्यांना ‘मातोश्री’वर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी नेण्यात आले.   

Story img Loader