ठाणे शहरातील एका पोलीस ठाण्यात एका किशोरवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ३० वर्षीय व्यक्तीने एका उपनिरीक्षकाला धक्काबुक्की केल्याने हाताचे हाड मोडले आहे. आरोपींनी पीडितेच्या वडिलांनाही मारहाण केली आहे. आरोपींनी कोपरी परिसरात बुधवारी पहाटे १९ वर्षीय मुलीसोबत अश्लिल कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता असे पोलिसांनी सांगितले. जेव्हा महिलेच्या वडिलांनी त्याला फटकारले, तेव्हा आरोपींने त्यांना मारहाण केली, असे कोपरी पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जेव्हा पीडितेच्या वडिलांनी आरोपीला फटकारले तेव्हा त्याने त्यांना मारहाण केली. यानंतर शेजाऱ्यांनी आरोपीला पकडले आणि पोलिसांना बोलावले. त्यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला पकडले. आरोपीला पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि तिथे त्याने सुरक्षा कर्मचारी, पीडित आणि तिच्या वडिलांना शिवीगाळ केली असे कोपरी पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

उपनिरीक्षकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांना ढकलले. यामुळे पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताचे हाड मोडले आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आणि त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली विनयभंग आणि पोलिसांना कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.