मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजपची नगरसेविका वर्षां गिरधर भानुशाली (३६) हिला एका दुकानदाराकडून ५० हजारांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी अटक केली. भाईंदर येथील वॉर्ड क्रमांक १४, हनुमाननगरची ती नगरसेविका आहे.
तक्रारदाराला दुकानाची दुरुस्ती करून उंची वाढवायची होती. याकरिता परवानगी देण्यासाठी वर्षां भानुशाली हिने तक्रारदाराकडे एक लाख ६० हजारांची लाच मागितली होती. त्यांपैकी ६० हजार रुपये शुक्रवारी द्यायचे ठरले होते. या प्रकरणी तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार या विभागाच्या पथकाने सापळा रचून  भानुशाली हिला राहत्या घरी तक्रारदाराकडून ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader