मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजपची नगरसेविका वर्षां गिरधर भानुशाली (३६) हिला एका दुकानदाराकडून ५० हजारांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी अटक केली. भाईंदर येथील वॉर्ड क्रमांक १४, हनुमाननगरची ती नगरसेविका आहे.
तक्रारदाराला दुकानाची दुरुस्ती करून उंची वाढवायची होती. याकरिता परवानगी देण्यासाठी वर्षां भानुशाली हिने तक्रारदाराकडे एक लाख ६० हजारांची लाच मागितली होती. त्यांपैकी ६० हजार रुपये शुक्रवारी द्यायचे ठरले होते. या प्रकरणी तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार या विभागाच्या पथकाने सापळा रचून भानुशाली हिला राहत्या घरी तक्रारदाराकडून ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा